आज सुट्टीचा दिवस अन घरात एकटाच असल्याने खुप वेऴ अंधरूनावर पडुनच होतो. सकाऴी विकास टेलरचा फोन आला पण त्याच्याकडे पण लवकर जाणे झाले नाही. आज अचानक लहर आली. अन माझ्या पिल्लुला फोन केला. आज कस काय कुणास ठावुक पण हिने(सृष्टीची आई) माझा फोन उचलला. व माझ्या पिल्लु माझा फोन दिला. मी माझ्या पिल्लूला खूप खूप बोलावस वाटत होत. पण माझ बाळ मला बोलत नव्हत.
मंगळवार, १७ एप्रिल, २०१२
शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२
ताई तुझ्या प्रेमाला माझा मनाचा मुजरा.....!!! असता सोबत सावित्री.....!!! काय करील यम काळरात्री......!!!!!
अपंग प्रियकरासाठी ती झाली पाय अन् मायही!
बालवयापासूनच त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. वय वाढत गेलं तसं प्रेमही फुलत गेलं. अधिक गहिरं
होत
गेलं. पण एक दिवस अचानक त्याचा अपघात झाला. दोन्ही हात आणि एक पाय गमावला. त्या
परिस्थितीतही ती त्याला हिंमत देते.
अश्या प्रेयसिला सलाम..!!
सुमेध वाघमारे। दि.१0 (ंनागपूर)
बालवयापासूनच त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. वय वाढत गेलं तसं प्रेमही फुलत गेलं. अधिक गहिरं
होत
गेलं. पण एक दिवस अचानक त्याचा अपघात झाला. दोन्ही हात आणि एक पाय गमावला. त्या
परिस्थितीतही ती त्याला हिंमत देते.
अश्या प्रेयसिला सलाम..!!
सुमेध वाघमारे। दि.१0 (ंनागपूर)
बालवयापासूनच त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. वय वाढत गेलं तसं प्रेमही फुलत गेलं. अधिक
गहिरं होत गेलं. पण एक दिवस अचानक त्याचा अपघात झाला. दोन्ही हात आणि एक पाय गमावला. त्या
परिस्थितीतही ती त्याला हिंमत देते. त्याला उभं राहता यावं म्हणून स्वत:चा खांदा देते. कृत्रिम हात-पाय
लावून तो उभाही होतो. पण आपल्यामुळे हिचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तो तिच्यापासून दूर
जाण्याचा प्रयत्न करतो. तिला हे सहनच होत नाही. एकदा ती आईला मनातली गोष्ट सांगते. तो अपंग,
आपल्या जातीचा नाही म्हणून आई तिला अडवते. पण ती ऐकायलाच तयार नसते. तिला घरात कुलूपबंद
केले जाते.
तब्बल पाच महिने ती घरातच बंद असते. अखेर त्यालाही राहावत नाही. एके दिवशी दोघंही लपून घराबाहेर
पडतात. न्यायालयात लग्न करतात. आज त्यांना दोन मुलं आहेत. दोघंही थोडं फार कमावतात. वर्ष
उलटली. उन्हाळे पावसाळे गेले. जग बदललं. पण प्रेम तसूभरही ओसरलं नाही.
सुरेंद्र आणि नम्रता कळमकर हे या प्रेमीयुगुलाचं नाव. मानेवाडा रोडवरील सरस्वतीनगरात त्यांच्या प्रेमाचं
घरटं आहे. काकडे इलेक्ट्रिकल्समध्ये सुरेंद्र सुपरवायझर आहे तर नम्रता एका स्थानिक टीव्ही वाहिनीमध्ये
कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. सुरेंद्रला दोन्ही हात नसले तरी सहकार्यांकडून तो नीट काम करवून घेतो.
कामावर जाताना नम्रता त्याला डबा करून देते.
अपंगत्त्व आल्यानंतर सुरेंद्रला कधीही अडचणी जाणवल्या नाही. कारण नम्रताचा खांदा त्याच्या आधाराला
होता.
दुपारच्या जेवण्याच्या वेळी सुरेंद्रला त्याचे सहकारीच भरवतात. आज मात्र त्याला घास भरवण्यासाठी
नम्रता
स्वत: आली होती. या दोघांनीही आपल्या जुन्या आठवणी ‘लोकमत’शी शेअर केल्या. सुरेंद्र म्हणाला, हिचे
घर आठ-दहा घरं सोडून होते. त्यामुळे हिची नेहमीच घरी ये-जा होती. त्यावेळी ती दहावीत होती. ती
माझ्या
प्रेमात पडली. हळूहळू मलाही त्याची जाणीव होऊ लागली. मीही तिच्या डोळ्यात डोळे मिसळून भान
हरवत
गेलो. हळूहळू वय वाढत गेलं तसं आमच्यातील प्रेमंही फुलत गेलं. मी शिक्षण अर्धवट सोडून
इलेक्ट्रिशिअन
म्हणून एका कंत्राटदाराकडे काम करू लागलो.
१६ एप्रिल १९९७ हा दिवस माझ्यासाठी काळा दिवस ठरला. कंत्राटदाराचे कन्हान येथे काम सुरू होते. मी
एका विद्युत खांबावर चढलो. त्या खांबावरून जास्त दाबाची विद्युत वाहिनी गेली होती. अचानक जादा
दाबाच्या विजेचा जोरात धक्का लागला. ३0 फूट उंचावरून खाली कोसळलो. मला लगेच नागपुरात एका
खासगी इस्पितळात हलविण्यात आले. दुखापत इतकी भीषण होती की डॉक्टरांना माझे दोन्ही हात आणि
उजवा पाय कापावा लागला. माझा अपघात झाल्याचे कळताच ही धावत आली. माझी अवस्था पाहून हिला
रडायला येत होतं पण रडली नाही. तू बरा होशील असा धीर तिने दिला. नुसता धीरच दिला नाही तर
वर्षभर
माझी सेवा केली. मला उभं करण्यासाठी हिंमत आणि स्वत:चा खांदाही दिला. कृत्रिम हात-पाय लावून मी
उभाही झालो. पण आपल्यामुळे हिचे आयुष्य बरबाद होत आहे, असे सारखे वाटायचे. अनेक वेळा मी तिला
समजविण्याचा प्रयत्नही केला. पण ती मानायलाच तयार नव्हती. म्हणून मी तिच्यापासून दूर राहू
लागलो.
तिला हे सहन झालं नाही. एकदा तिने आपल्या आईला मनातली गोष्ट सांगितली. पण अपंग होतो, तिच्या
जातीचा नव्हतो म्हणून आईने तिची खूप समजूत काढली. तिने ऐकलेच नाही. शेवटी तिला घरात कुलूपबंद
केले. तब्बल पाच महिने ती घरातच बंद होती. मलाही तिच्याविना करमत नव्हते. तिच्या प्रेमाची ओढ
सतावू लागली. अखेर १६ एप्रिल २000 रोजी दोघंही लपून घराबाहेर पडलो. एका गावात नातेवाईकाकडे
थांबलो. दुसर्या दिवशी न्यायालयात जाऊन लग्न केले. आज आम्हाला निहाल आणि अनुज ही दोन मुलं
आहेत. सुरेंद्र भडाभडा बोलत होता. नम्रता त्याच्याकडे नुसतीच पाहात होती. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले
होते. तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ती म्हणाली, भाऊ लंच टाईम
आहे, यांना जेवण देते. ते दोघंही जमिनीवर बसले. डब्यातून एक-एक घास करून तिने त्याला भरवले. ती
म्हणाली, भाऊ यांचा कृत्रिम हात खराब झाला आहे. नवीन हातासाठी लाखाच्यावर पैसा लागणार आहे.
एवढी मदत जर कुणाकडून झाली तर यांना काम करायला मदत होईल, अशी विनंती करीत ती आपल्या
कामावर निघून गेली.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)