आज बीडला जाऊन माझा कोर्टातील दावा माघारी घेण्याचा निश्चित केला होत. त्या मुळेच आज रजा घेतली होती. सकाळी उठायला ८:३० वाजलेच. सकाळी सकाळ वाचत बसलो असता. सावंत सर आले. त्यांनी त्यांच्या Tax च्या संबंधात माहिती हवी होती. त्यांच्या शंकांचे समाधान करून व त्यांना चहा पाजून. पुन्हा सकाळ वाचत बसलो. साधारण ९:१५ वाजले असतील. कि भीमराव गावली सर आले. त्यांचे गृहकर्जाचे काम आहे आज साहेबांनी त्यांना सांगितले होते कि त्यांचे घर बघण्यास झा साहेब व घोडके साहेब येत असल्याचे सांगितले होते. पण मी आज रजेवर जात असल्याने आज साहेब सरांच्या कामासाठी बीडला जाऊ शकणार न्हवते. सर आल्यावर त्यांनी मला विचारले कि आज किती वाजता येऊ. त्या वर मी त्यांना सर्व प्रकार सांगितला. व उद्या मात्र साहेब व घोडके साहेब दोघेही त्यांचे घर पाहण्यास येतील अस संगितले. त्या नंतर सरांनी साहेबांचा पाहुणचार वैगेरे साठी विचारू लागले त्यावर मी त्यांना म्हणोलो "तसल्या फनद्यात पडू नका." आणि करायचाच असेल तर केवळ चहा पाण्यावर भगवा.
गवळी सर गेल्या नंतर मी अंघोळ केली. व बीडला जाण्याची तयारी केली. पण लक्ष्यात आलं कि माझ्याकडे पेन नाही. आज अक्का कामाला गेली. कामाला जाताना तिन मी किती वाजता बीड वरून येणार आहे. व त्या नंतर अक्का कामाला गेली. मी दुध घेतला व माझी बॅग घेतली व पेन घेण्यासाठी बँकेकडे गेलो. कोकीळ साहेब १०:३० वाजता आले व त्यांच्या नंतर झा साहेब आले. मी माझा पेन घेतला व बीडला आलो.
येताना मला विकास टेलरचे बंधू रमेश गायकवाड भेटले जातात माझ्या कोर्टाच्या कामा विषयी गप्पा निघाली. गप्पाच्या ओघात. मी माझी सारी कथा गायकवाड यांना सांगितली. व मला दुसरे लग्न करायचे असल्याचे सांगून त्यांना त्यांच्या पाहण्यात एखादी मुलगी आहे का ते पाहण्यास संगितले. व तसेच माझ्या ती हि सांगितल्या त्या वर त्यांनी त्यंच्या परिचयात कोणी मुलगी आहे का ते पाहतो असे आश्वासन दिले. बीड मध्ये आल्यावर मी व गायकवाड दोघांनी मिळून नास्ता केला. त्याचे ५५.०० रुपये मी दिले.
त्या नंतर आम्ही दोघं कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यावर मी Adv. पलसोकारांना फोन केला. पण Adv.पळसोकरांनी ते औरंगाबादला जाणार असल्याचे संगितले. व मला नांना भेटून दावा माघारी घेत असल्याचे नांना सांगा व पैश्यान विषयी विचारण्यास संगितले. त्या बरहुकूम मी नानांची भेट घेतली व पैसे किती जमा करायचे त्या विषयी विचारले त्या वर त्यांनी मला ५०००.०० रुपये जमा करण्यास सांगितले. तसा निरोप मी पळसोकरांना सांगितला. त्या वर त्यांनी मला ते औरंगाबादला जात असल्याचे व अर्जावर गोस्वामी किंवा इतर कोंणी जुनियर वकीलास अर्ज माघे घेण्यास नांना सांगा असे सांगितले. तसे मी नांना सांगितले त्यांनी ते काम गोस्वामी यांना सोपविले. पण मी नांना पैश्याविषयी बोललो होतो. व आज कांही व नंतर कांही पैसे जमा करतो असे त्यांना म्हणालो होतो. त्यामुळे नानांनी गोस्वामी यांना कांही तरी बोलले होते. त्यांचा राग त्यांनी माझ्या वर काढण्यास सुरु केले. त्यात मला Adv. राजापूरकर दिसत नव्हते कारण त्यांना सदरील अर्ज बरोबर आहे का ते विचारयाचे होते. मी व गोस्वामी कोर्टात आलो. त्यांना मी शंका विचारली तर त्यांनी अर्ज माझ्या जवळ दिला व ते कोर्टाच्या वरच्या मजल्यावर गेले व जाता जाता मला ०२:३० पर्यंत कोर्टाच्या पुढे थांबण्यास सांगितले.. त्या नंतर गोस्वामीची वाट पहात मी राजापुराकारांच्या टेबलावर बसलो. तसेच राजापुराकारची पण मी वाट पाहत राहिलो. तब्बल गोस्वामी तसा भाराने आले. व त्यांनी मला रागावतचा सदरचा अर्ज कोर्टा समोर सादर करण्यासाठी तयार झाले. पण तेंव्हाच राजापूरकर यांची भेट झाली तेंव्हा राजापुर्क्रयांना कोर्टात सादर करावयाचा पोरशिस दाखून घेतला.
पोरशिस पाहून राजापूरकर मला म्हणाले "दाखल करा, सर्व ठीक आहे नाही तरी तुम्ही सोलापूर मध्ये अर्ज दिलाचा आहे. त्या मुळे पोरशिस बदलून कांही उपयोग नाही."