शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

बर झाला अवदसा टळली आज एक नवा दिवस ठरला................!!!!!!!!!

                                                        !! श्री !!                                                                                           
                 आज भारतीय सौरशके -१९३३, मार्गशीर्ष शुक्ल -१४, वार-शुक्रवार, श्रीदत्त जयंती (श्रीक्षेत्र गाणगापूर), दिनांक-०९/डिसेंबर/२०११.

                    आज पहाटेच ०४:४० ला गजरामुळे जाग आली. उठल्यावर व्यायमला जाण्यासाठी अगोदर गवळी सर यांना ३ वेळा फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्या नंतर डोरले सर यांना फोन केला. पण त्यांनी पण फोन उचलला नाही. त्यामुळे गवळी सर व डोरले सर यांना झोपीतुन उठवण्याचे ठरवले. व बर्मुडा घातला त्याच बरोबर शाल,बॅटरी घेतली. बाहेर आलो बकेट घेतली व चौकात गेलो. चौकात गेल्यावर पण गवळी व डोरले यांना फोन केले पण दोघांनी पण प्रतिसाद दिला नाही. मग मात्र या दोघांना उठवण्याचा ठरवल. व अगोदर गवळी यांच्या घरी जाऊन त्यांना हाका मारल्या. ते बाहेर आले नाहीत अस पाहून मग डोरले सर यांच्या घरी जाऊन यांना हाका मारून उठवण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. मग मात्र स्वतः एकटाच व्यायम करण्यास जाण्याचे ठरवले. व परत निघालो. पण गवळी सर यांच्या घरा समोरून जाताना पाहिलं की, ते जागे झाले आहेत. मग यांना आवाज दिला व मी चौकात येऊन थांबलो. माझ्या माघून गवळी सर आले. सर आल्यावर आम्ही दोघे व्यायाम करण्या गेलो. जाताना गप्पा मारत पण थोड्या वेगानेच गेलो. नेहमीच्या ठिकाणी व्यायाम केला. व साधारण ०६:२८ ला परत आलो. घरी परत आल्या आल्या झोपलो. 
                    झोपण्याचा प्रयत्न केला पण झोपू शकलो नाही. त्यामुळे ९:३५ पर्यंत नुसता पडून होतो. ९:३५ ला  उठलो. उठून अगोदर दाडी केली व त्या नंतर अंघोळ केली. अंघोळ उरकल्या नंतर बीडला जाण्याची तयारी केली. नास्ता व दुध घेतला व अक्काचा निरोप घेऊन बीडला जाण्यास निघालो. चौकात आलो तर तेथे गाडीची वाट पाहत असताना एका खातेदाराने मला हाक मारून घेतली त्यामुळे थोडा वेळ तेथे रेंगाळलो. तेव्हड्यात डोरले सर दिसले मग त्यांच्याकडे गेलो व त्यांना म्हणालो. 
"काय डोरले सर आता दंड द्या."
डोरले सर "ठीक आहे. कला गावात."
मी " ठीक आहे." 
अस म्हणून डोरले सरांच्या गाडी वर बसलो. व आम्ही दोघे गावात गेलो. गावात जाताच सरांनी काळे यांच्या हॉटेलकडे गाडी घेतली. तेथे आम्ही दोघांनी चहापाणी केले. त्यांच्या समोरच झा यांना फोन केला व सरांच्या एटीम कार्ड विषयी विचारला. व त्यांना झा साहेबाना भेट असे सांगून स्टँडकडे जाता जाता विकास टेलरच्या दुकानात थांबलो. तेथे दिनूच्या सह्याकेल्या व टेलरचा निरोप घेऊन स्टँडकडे वर आलो. तेथे आल्यावर विठ्ठल वंजारे याने हाक मारल्याने त्यांच्याकडे गेलो. त्यांनी त्यांच्या कामाची माहिती विचारली तेथे ही दुध घेतला व पुन्हा स्टँड वर येऊन थांबलो. तेथे एक आजोबा भेटले ते मांजरसुंभा येथे जाणार होते. त्या आजोबाना मी भेटल्याचा काय विशेष वाटल कुणास ठाऊक. ते माझ्या पायाचा पडू लागले. मी लगेच बाजूला झालो. व त्यांची विचारपूस सुरु केली. बहुदा ते त्यांच्या मुलीस भेटण्यासाठी आले होते. पण त्यांचा सोबत मी खूप वेळ थांबू शकलो नाही. कारण ते १ ला गेले असता नेकनुरच्या एका मुलाने मला लिफ्ट दिली त्याच्या गाडी वर मी नेकनूर पर्यंत गेलो. तेथे गेल्या गेल्या मला बीडला जाणारी गाडी भेटली. 
                    बीडला सरकारी दवाखान्या जवळ उतरू S.P. ऑफिस समोरील हॉटेलमध्ये नास्ता केला. व कोर्टाकडे निघालो. कोर्टात पोचताच पळसोकारांची भेट घेतली. त्यांनी मला कोर्टाने अर्ज माघारी घेत असल्याचे कारण विचारले तर " माझी पत्नी माझ्या बरोबर नांदावयास तयार असल्याने व मला मुलीच्या भविष्याची काळजी असल्याने सदर दावा चालवचा नाही. त्या मुळे मी दावा माघारी घेत आहे." असे उत्तर द्या म्हणून सांगितले. व मला लांब बसण्यास सांगितले. मी तहसील ऑफिसच्या बाजूला जाऊन थांबलो.व पळसोकारानि बोलावण्याची वाट पहात थांबलो. थोडावेळ तेथे थांबल्यावर आठवल की, माझे बूट असलेल्या जीप वल्यास फोन करू विचारावे की, तो बीड मध्ये आला आहे की नही. त्याला फो करून विचारले तर त्याने सांगितले की, माझे बूट डबीरच्या घरी आहेत. मी लगेच डबीरच्या घरी गेलो. डबीरयांची पत्नी व मुलगा घरात होते. बूट पिशवीत घातला. पाणी घेतला व त्या ताईचा निरोप घेतला व परत निघालो. परत निघताच पळसोकरांचा मला फोन आला. व फोन वर त्यांनी माझी बायको आल्याचे सांगितले. मी लगेच रिक्शाया केला व तडक कोर्टात गेलो. जाता जाता माझे बूट व ब्याग संपदा स्टेशानरी दुकानात ठेऊन कोर्टात गेलो. तेथे पाहतो तर काय पळसोकर हे माझी बायको, सासरा व त्यांचे वकील यांच्या सोबत बोलत असलेले पहिले. मला पाहताच पळसोकर माझ्याकडे आले. व त्यांनी मला अर्ज माघारी घेण्यास तिची आडचन नसल्याचे सांगितले. पण ते आपणास दंड मागतील अस सांगितला. व ते त्यांचा "से" देणार असल्याचे सांगितले. व पुन्हा मला पहिल्याच जागी बसण्यास सांगितले. त्या प्रमाणे मी जाऊन बसलो. पण माझा फोन डिसचार्ज झाल्याने मी फोन चार्जिंग करण्यासाठी पुन्हा समदा मध्ये गेलो. व तेथे माझ्याकडे असणारी एक बॅटरी चार्जिंगला लावली व परत कोर्टात जाऊन बसलो. त्याचा वेळेस मला २ ला जावे लागले. मी जाताच मला पळसोकरांचा फोन आला. मी परत येई पर्यंत तर पळसोकर कोर्टातून बाहेर आले होते. त्याचा दरम्यान एका मूर्ख बाईचे मला बोलणे खावे लागले. दरम्यान पळसोकरांची भेट घेतली व त्यांनी मला त्यांच्या टेबला जवळ थांबण्यास सांगितले. त्या प्रमाणे मी टेबला जवळ थांबलो. एव्हाना कोर्टाच्या जेवणाची सुट्टी झाली होती. मी कोर्ट सुरु होण्याची वाट पाहत थांबलो.

शनिवार, ३ डिसेंबर, २०११

आज अर्ज माघारी घेण्याचा निर्णय पक्का केला................!!!!!!!

               आज बीडला जाऊन माझा कोर्टातील दावा माघारी घेण्याचा निश्चित केला होत. त्या मुळेच आज रजा घेतली होती. सकाळी उठायला ८:३० वाजलेच. सकाळी सकाळ वाचत बसलो असता. सावंत सर आले. त्यांनी त्यांच्या Tax च्या संबंधात माहिती हवी होती. त्यांच्या शंकांचे समाधान करून व त्यांना चहा पाजून. पुन्हा सकाळ वाचत बसलो. साधारण ९:१५ वाजले असतील. कि भीमराव गावली सर आले. त्यांचे गृहकर्जाचे काम आहे आज साहेबांनी त्यांना सांगितले होते कि त्यांचे घर बघण्यास झा साहेब व घोडके साहेब येत असल्याचे सांगितले होते. पण मी आज रजेवर जात असल्याने आज साहेब सरांच्या कामासाठी बीडला जाऊ शकणार न्हवते. सर आल्यावर त्यांनी मला विचारले कि आज किती वाजता येऊ. त्या वर मी त्यांना सर्व प्रकार सांगितला. व उद्या मात्र साहेब व घोडके साहेब दोघेही त्यांचे घर पाहण्यास येतील अस संगितले. त्या नंतर सरांनी साहेबांचा पाहुणचार वैगेरे साठी विचारू लागले त्यावर मी त्यांना म्हणोलो "तसल्या फनद्यात पडू नका." आणि करायचाच असेल तर केवळ चहा पाण्यावर भगवा.
                गवळी सर गेल्या नंतर मी अंघोळ केली. व बीडला जाण्याची तयारी केली. पण लक्ष्यात आलं कि माझ्याकडे पेन नाही. आज अक्का कामाला गेली. कामाला जाताना तिन मी किती वाजता बीड वरून येणार आहे. व त्या नंतर अक्का कामाला गेली. मी दुध घेतला व माझी बॅग घेतली व पेन घेण्यासाठी बँकेकडे गेलो. कोकीळ साहेब १०:३० वाजता आले व त्यांच्या नंतर झा साहेब आले. मी माझा पेन घेतला व बीडला आलो. 
                 येताना मला विकास टेलरचे बंधू रमेश गायकवाड भेटले जातात माझ्या कोर्टाच्या कामा विषयी गप्पा निघाली. गप्पाच्या ओघात. मी माझी सारी कथा गायकवाड यांना सांगितली. व मला दुसरे लग्न करायचे असल्याचे सांगून त्यांना त्यांच्या पाहण्यात एखादी मुलगी आहे का ते पाहण्यास संगितले. व तसेच माझ्या ती हि सांगितल्या त्या वर त्यांनी त्यंच्या परिचयात कोणी मुलगी आहे का ते पाहतो असे आश्वासन दिले. बीड मध्ये आल्यावर मी व गायकवाड दोघांनी मिळून नास्ता केला. त्याचे ५५.०० रुपये मी दिले. 
                    त्या नंतर आम्ही दोघं कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यावर मी Adv. पलसोकारांना फोन केला. पण Adv.पळसोकरांनी ते औरंगाबादला जाणार असल्याचे संगितले. व मला नांना भेटून दावा माघारी घेत असल्याचे नांना सांगा व पैश्यान विषयी विचारण्यास संगितले. त्या बरहुकूम मी नानांची भेट घेतली व पैसे किती जमा करायचे त्या विषयी विचारले त्या वर त्यांनी मला ५०००.०० रुपये जमा करण्यास सांगितले. तसा निरोप मी पळसोकरांना सांगितला. त्या वर त्यांनी मला ते औरंगाबादला जात असल्याचे व अर्जावर गोस्वामी किंवा इतर कोंणी जुनियर वकीलास अर्ज माघे घेण्यास नांना सांगा असे सांगितले. तसे मी नांना सांगितले त्यांनी ते काम गोस्वामी यांना सोपविले. पण मी नांना पैश्याविषयी बोललो होतो. व आज कांही व नंतर कांही पैसे जमा करतो असे त्यांना म्हणालो होतो. त्यामुळे नानांनी गोस्वामी यांना कांही तरी बोलले होते. त्यांचा राग त्यांनी माझ्या वर काढण्यास सुरु केले. त्यात मला Adv. राजापूरकर दिसत नव्हते कारण त्यांना सदरील अर्ज बरोबर आहे का ते विचारयाचे होते. मी व गोस्वामी कोर्टात आलो. त्यांना मी शंका विचारली तर त्यांनी अर्ज माझ्या जवळ दिला व ते कोर्टाच्या वरच्या मजल्यावर गेले व जाता जाता मला ०२:३० पर्यंत कोर्टाच्या पुढे थांबण्यास सांगितले.. त्या नंतर गोस्वामीची वाट पहात मी राजापुराकारांच्या टेबलावर बसलो. तसेच राजापुराकारची पण मी वाट पाहत राहिलो. तब्बल गोस्वामी तसा भाराने आले. व त्यांनी मला रागावतचा सदरचा अर्ज कोर्टा समोर सादर करण्यासाठी तयार झाले. पण तेंव्हाच राजापूरकर यांची भेट झाली तेंव्हा राजापुर्क्रयांना कोर्टात सादर करावयाचा पोरशिस दाखून घेतला. 
                पोरशिस पाहून राजापूरकर मला म्हणाले "दाखल करा, सर्व ठीक आहे नाही तरी तुम्ही सोलापूर मध्ये अर्ज दिलाचा आहे. त्या मुळे पोरशिस बदलून कांही उपयोग नाही."

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

बीडला जाणार होतो पण..........!!!!!!!

       आज रोजच्या प्रमाणे उठून घरातील सर्व कांही उरकून कामाला निघतानाच Avd. पळसोकरांचा फोन आला. त्यांनी मला माझा निर्णय झाला कि नाही त्या विषयी विचारले मी त्यांना माझा निर्णय झाला असल्याचे संगितले. त्या नंतर त्यांनी मी काल बीडला आला होतात का? अस विचारला. त्यावर मी त्यांना हो म्हणालो.
        एव्हाना माझ सर्व उरकून कामाला जात असतानाच श्री.ढवळशंखसरांचे पुतणे भेटले म्हणजे त्यांनी मला पाहूनच गाडी थांबवली. व मला बँकेजवळ आणून सोडले. तसेच वाटेत त्यांच्या काकांचे गृघकर्जाच्या व्याजाचे प्रमाणपत्र विषयी चौकशी केली. मी त्यांना दुपारी चार नंतर येण्यास सांगितले. आज मी कामाला १०:१५ लाच पोहचलो होतो. त्या नंतर १०:३५ ला झहा व कोकीळ साहेब आले. नेहमी प्रमाणे काम झाल. दुपारी आरके मामा सोबत काळे यांच्या हॉटेलवर चहा घेतला. गेली आठ एक दिवस थोडा बाहेर जाण्यास वेळ मिळतोच आहे. तेव्हडेच पाय मोकळे होतात. आज पळसोकाराना भेटण्या साठी जायचं सकाळीच ठरवला होत. सकाळीच साहेबाना मला उद्या ता. ०२/१२/२०११ रोजी रजा पाहिजे असल्याचे संगितले होते. जेवण झाल्यावर दुपारी सर्व काम आटोपल्या नंतर मारत दर पंधरा मिनिटांनी सतत साहेबाना उद्याच्या रजेचा विचारून रजा पदरात पडून घेतली. त्या नंतर बँक सुटल्यावर कोकीळ साहेबांकडे माझी चावी दिली.
                    मी कोकीळ व रोटे बसटॉप वर आलो. बीडला जाणार होतो. पण निर्णय बदलला. आज दुपारी कोकीळ साहेब यांना काल त्यांच्या पत्नीस व त्यांना रिक्ष्याने ठोस दिल्याचे कळले. त्यात कोकीळ यांना पायास व हातास जबर लागले होते. तश्या अवस्थेतही त्यांनी मला रजेवर जाण्यास मद्दत केली. त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार. मी उद्या बीडला येणार असल्याचे पळसोकाराना फोन करून सांगायचे होते. पण ते शक्य झाले नाही.
                  काम सुटल्यावर काळबेरे यांच्या नेकनूर येथील नेटक्याफेवर जावून बसलो. तेथे पण संगणक दोन तीन वेळा बंद पडून माझ्या नेक्नुरला जाण्याचा पुरा विचका केला. तरी हि नेकनूर येथून मला बाहेर पडण्यास ०९:२० झाल्याचा त्या मुळे धारूर गाडी गेली होती. मग मिळेलत्या वाहनाने जाण्याचे ठरून. वरून (मांजरसुंभा) येणाऱ्या प्रतेक वाहनास हात करू लागलो. दरम्यान आक्काचा चार पाच वेळा फोन आला होता. शेवटी एक कर थांबल्याचा भास झाला पण ती पुढे गेली. पण त्या कर मधून एक व्यक्ती उतरून मला हात करत असल्याचे जाणवले. वाटल आता बर झाल. जायला वाहन भेटलं म्हणून गाडीच्या जवळ जाऊन पाहतो तर काय. ती गाडी विठ्ठल वंजारेची होती व त्यांनी मला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली होती. त्यांच्या गाडीत येळम्ब पर्यंत आलो. येताना वाटेत. विठ्ठल वंजराने ते लातूरला गेल्याचे सांगितले. वाटेत त्यांच्या कर्जाचा मुद्दा निघाला. पण ते नशेत असल्याने मी केवळ त्यांना हो हो म्हणत होतो. घरी आल्यावर त्यांनी गाडी आमच्या घर समोर थांबवली व कांही वेळ थांबले. त्यांना मी पाणी विचारले पण त्यांनी पाणी पिण्यास नकार दिला. पुन्हा मी घरी येऊन टीव्ही पाहत बसलो.
                 रात्रीच जेवण केलं व रोजच्या प्रमाणे टीवी पाहून झोपलो.
..............................................************ शुभरात्री.....!!!!! ************ ..............................................

गुरुवार, १ डिसेंबर, २०११

राजापूरकर यांची भेट. आज दिनक : २९/११/२०११ वर बुधवार

Add caption
             आज जरा उशिराने उठण्याचा प्रयत्न केला पण कणही उपयोग झाला नाही. रात्री महिंद्रकर यांना फोन केला होता. तेंव्हा त्यांनी मला बीड येथील अर्ज मघारी न घेण्या विषयी सुचवले. पण मी त्यांना माझ्या शंका विचारल्या त्यावर त्यांनी सदर अर्ज हा केवळ सृष्टीच्या आई कडून ती माझ्या सोबत नंद्न्र आहे की नाही ते कडून घेण्यासाठी. अर्ज दिल्याचे संगितले. पण त्यांच्या या उत्तराने माझे समाधान झाले नाही.  तसेच श्री. महिंद्रकर यांनी मला बीडच्या ९ तारखेच्या निकालास अपील करण्याचे सुचवले. त्यावर मी त्यांना विशेष असे कांही बोललो नाही.
           कामाला जाताना मला Adv.पळसोकरांचा फोनला व त्यांनी माझा निर्णय विचारला. व जो कांही निर्णय घ्यावयाचा आहे. ता. ९ च्या  आत घेण्यास संगितले. तसेच माझ्या प्रकरणातील फोलपणा सांगण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर मी त्यांना लवकरच माझा निर्णय सांगण्याचे वचन देऊन फोन ठेवला. त्या नंतर कामाला गेलो. आज थोडी गर्दी कमी असल्याने एक वेळ काळेच्या हॉटेलवर दुध्द पण घेऊन आलो. दुपारी साल्पे काका व खंदारे सर बँकेत आले होते. सकाळी स्लापे काकाने मला फोन करून त्यांच्या शाळेतील मुलांची खाती उघडण्यास सांगितले होते. त्यासाठीचा साल्पे काका आज बँकेत आला होता. साल्पेकाका येण्याच्या आत मी त्याचे काम करून ठेवले होते. दुपारी काकाचे काम करून देऊन. काकासोबत चहा घेण्यास गेलो. व तेथेच खंदारे सरांनी आणलेले मासे खाण्यासाठी बाहेर जाण्याचे ठरले. त्यानंतर मी माझे बँकतील काम उरकले. व मॅनेजर झा यांना तासाभरात परत येण्याचे सांगून. साल्पेकाका सोबत समृद्धी ढाब्यावर मासे खाण्यास गेलो.
               आमची वाट पहात खंदारे सर बसलेले होते. बहुतेक ते कंटाळले होते. आम्ही पोहचल्या नंतर मासे बनवण्यास संगितले. तो पर्यंत मासे शिजवण्या सारखे झाले होते. साप्लेकाका जाताच खंदारे सर व काका यांच्यात दारू व बिलाच्या पैश्या वरुन खलबते झाली. शेवटी जेवणाचे एकाने व मद्याचे एकाने पैसे भरायचे ठरले. त्यांचा वादात मला काकाने सामील करून घेतला नाही. कारण मी त्यांना सुरवातीलाच ड्रिंक करणार नाही अस सांगितलं होत. आमच्या जेवणास तब्बल एक तास लागला. जेवण झाल्यावर काका व मी बँकेकडे आलो.त्या नंतर सकॅनिंग व सकाळी आलेले बचत खात्यांची पासबुक बनवून घेतली. या सगळ्यान ५:०० वाजल्या. त्या नंतर कोकीळ साहेब व रोटे तसेच मी बीडला आलो. मी सरकारी दवाखाण्या जवळ उतरून थेट रीक्ष्या केला व Adv. राजापूरकर यांचे घर गाठले.  Adv. राजापूरकर यांच्या घरी मला कोणी दिसत नव्हते. म्हणून थोडा वेळ तेथेच घुटमळलो. व त्यांच्या दारावरची बेल वाजवली. बेल वाजवताच राजापूरकर यांनी मला ०७:३० पर्यंत त्यांच्या चेंबर मध्ये थांबण्यास संगितले. त्यानंतर मी राजापूरकर यांची वाट पहात त्यांच्या कार्यालयात थांबलो. Facebook वर टाईमपास करीत करीत कसा तरी. अर्धा एक तास मी वाट पहात बसलो. तब्बल अर्ध्या तासांनी राजापूरकर आपल्या ऑफिस मध्ये आले. त्यांची भेट घेतली. राजापूरकर यांना भेटून. मंगलवारी लिहलेला पुरशीस त्यांना दाखवला.
त्यावर राजापूरकर मला म्हणाले."इतका मोठा पुरशीस लिहण्याची गरज नाही."
मी: मग काय ल्याहव लागेल.
राजापूरकर: मला सदर प्रकरण सध्या चालवणे नाही. इतक लह्या.
त्या नंतर मी त्यांना महिंद्रकर यांनी दिलेला सोलापूर कोर्टातील अर्ज दाखवला. त्यावर राजापूरकर हे महिंद्रकर यांच्यावर भलतेच बिघडले. व ते मला म्हणाले कि, "तुम्हाला तुमच्या बायकोस नंदावयाचे नाही, अस असतानाही तुमच्या त्या वाकीलाले असा अर्ज कसा काय दिला. या मूळे तुम्ही अडचणीत आला आहात. आणि या अर्जामुळे तुम्ही सुप्रीम कोर्टात जरी गेलात तरी तुम्हाला घटस्पोट मिळणार नाही. तुमच्या त्या वकिलाची अक्कल या अर्जावरून मला कळली आहे."
त्या नंतर राजापूरकर यांनी मला सोलापूरच्या वकिलांचे वकीलपत्र परत घेण्यास सुचवले. तसेच बीड येथील माझा घटस्फोटाचा अर्ज मघारी घेण्यास सांगितले. तसेच हा अर्ज माघारी घेऊन त्या नंतर तिला नांदण्यास येण्याची नोटीस बजावण्याचे सुचवले. व मला रविवारी किंवा मंगळवारी १०:०० ते ११:०० च्या दरम्यान भेटण्यास सांगितले. मी पण नाना व पळसोकरांचा तसेच सोलापूरचे महिंद्रकर यांच्या मध्ये कसा फसलो ते सांगितले. त्या नंतर त्यांनी नाना असल्या लहानसान प्रकरणात लक्ष्य देत नाहीत असे सांगितले. त्या नंतर मी नाझा निर्णय घेऊन. तडक एसटी स्टँड गाठले. स्टँडवर येताच मला अंबेजोगाई बस मिळाली. अंबेजोगाई बसने येळंबघाटला आलो. घरी आल्या नंतर जेवण केल व नेहमी प्रमाणे माझी आवडती मालिका "सास बिना ससुराल" हि मालिका बघितली व झोपी गेले.
..................................................***** शुभरात्री....!!!!! *****..................................................