माझी डायरी - २९/११/२०११ मंगळवार
आज सकाळी लवकर उठाव लागलं कारण आज सकाळी लवकरच ठिगळे नानांनी मला त्याच्या ऑफिस मध्ये बोलावला होत. त्यामुळे सकाळी सर्व उरकून बीडला आलो. बीडमध्ये येताच नानांच्या ऑफिसला गेलो. दरम्यान Avd. पळसोकाराना फोन केला. पण म्हणाले कि, तुम्ही नानांना भेटून अर्ज माघारी घेत असल्याचे सांगा. व त्यांनी जर बोलावलाच तर मला फोन करा मी येतो.
त्या नंतर नानाची भेट घेऊन त्यांना सर्व कांही सांगितलं. व सोलापूर येथे २००० ची ऑर्डर झाल्याचे सांगितले.
व मी माझा बीडच्या कोर्टातील अर्ज माघारी घेत असल्याचे सांगितले. त्यावर नाना मला म्हणाले."अर्ज का माघारी घेत आहेस?" तेंव्हा मी त्यांना म्हणालो "नाना माझा पगार नऊ हजार आहे. आणि सोलापूर येथे २०००.०० ची ऑर्डर झाली आहे. व बीडच्या कोर्टात नऊ तारखेला ऑर्डर होणार आहे. आणि जर बीडला दोन हजाराची ऑर्डर झाली तर मला खूपच अडचणी येतील. तसेच घरी आई आजारी असते. व माझा भाऊ हा मनोरुग्णा आहे तेंव्हा मी हा अर्ज माघारी घेत हे!"
त्यावर नाना म्हणाले "ठीक आहे! तुझ्या बायकोचं व तुझा बोलना झालय का?"
मी : नाही नाना!
नाना: तिचा कांही मत परिवर्तन झालय का?
मी: नाही!
नाना: ठीक आहे. मग कोर्टात भेट.
त्यावर मी नानाचा निरोप घेतला. व मोबाईलचा स्क्रीन बदलण्यासाठी गेलो. पण तेथे आणखी मोबाईलचा स्क्रीन आलेला नव्हता. तेथेच मोबाईलचा कि पॅड बदलण्याची ऑर्डर दिली. व तेथून कोर्टात गेलो. तेथे पळसोकारांची वाट पहात थांबलो. दुपारी बाराच्या नंतर पळसोकार आले.त्यांनी मला माझ कोर्टातला प्रकरण माघारी घेण्यासाठीचा अर्ज करू दिला. व मला म्हणाले हे नानाला दाखवा तसेच तुमच्या सोलापूरच्या वकीलांही फोन वर सांगा असे म्हणून मला नानांकडे घेऊन गेले. पण नाना कोर्टाच्या दुस-या मजल्या वरील कोर्टात होते. त्यांची वाट पाहण्यास संगितले. त्याच वेळेस Adv. राजापूरकर यांना मझा अर्ज दाखवला. ते ठीक हे अस म्हणाले. त्या नंतर नानांना कोर्टाच्या बाहेर येण्यास वेळ आहे अस पाहून मी पोस्टात जाऊन सकाळी तयार केलेलं पाकीट मावशीच्या नावे टपालात टाकून आलो. दरम्यान वाटेत भेळ खाली. व परत कोर्टात आलो. कोर्टात आल्यावर पळसोकरानी सदर अर्ज नानाला दाखवला. नानांनी मला ५००.०० रु. जमा करण्यास संगितले.
त्या नंतर त्यांचा निरोप घेऊन मी कोर्टाच्या बाहेर पडलो. व तसाच एन मार्ट मध्ये समान घेतलं. व धारूर गाडीसाठी एसटी सँडवर लो पण धारूर गाडी गेली होती त्यामुळे हौद्राबाद गाडीने येळंबल आलो. येताना रतनला पण भेटून आलो. घरी आल्यावर अकरा वाजे पर्यंत टीव्ही पाहून झोपलो. ..........................................******शुभरात्री.........!!!!!!!******........................................